अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी राज्य सरकारची ‘ही’ भूमिका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि मी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत.

118

महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेकडून नुकसानाबद्दलची निश्चित माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पीकविम्याचे पैसे लवकरच देणार

अतिवृष्टीसोबतच काही भागांतील धरणांचे पाणी सोडल्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक संकट आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या शेतकरी वर्ग, लोकप्रतिनिधींकडून करण्यात येतात. राज्य सरकारकडे अनेकांच्या मागण्या प्राप्त झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि मी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पीकविम्याचे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा सुरू आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

(हेही वाचाः पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, आधी मदत करा! राज ठाकरेंचे राज्य सरकारला पत्र)

आकडे पाहून निर्णय घेणार

राज्य सरकार संपूर्ण माहिती गोळा करत आहे. आकडे प्राप्त झाल्यानंतर सरकार निर्णय घेईल. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे निकष पाहून मदत करण्याची आमची भूमिका आहे. सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रशासनाला योग्य ते निर्देश देत आहोत, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.