मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार? लवकरच लोकलचा निर्णय होणार

महाविकास आघाडीतील मंत्री लोकलबाबत साकारात्मक असून, लोकल सुरू करावी असे सर्वांचे मत आहे. 

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली लोकल सर्वसामान्य लोकांसाठी कधी सुरू होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. आता लवकरच लोकल बाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, मुंबई आणि मुबई उपनगरांचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत म्हणजेच ४.४० टक्के इतका कमी झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत लोकलबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

काय होणार निर्णय?

राज्य सरकारने शुक्रवारी सर्व जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हिटी रेटची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबईतील निर्बंध आणखी शिथिल होऊ शकतात. मात्र हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारने महापालिकेला दिलेला असल्याने, मुंबई महापालिका काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील मंत्री लोकलबाबत साकारात्मक असून, लोकल सुरू करावी असे सर्वांचे मत आहे.

स्थानिक प्रशासन घेणार निर्णय

राज्य सरकारने बंधने शिथिल करण्यासाठी उपलब्ध ऑक्सिजन बेड आणि पॉझिटिव्ही रेट, असे काही निकष ठेवलेले आहेत. पॉझिटिव्ही रेट जास्त असेल, अशा जिल्ह्यांतील किंवा शहरांतील निर्बंध कायम ठेवण्याच्या सूचना यात राज्य सरकारद्वारे करण्यात आल्या आहेत. तर पॉझिटिव्ही रेट ५ टक्क्यांच्या आत असणाऱ्या जिल्ह्यांत काही ठिकाणीच निर्बंध ठेवण्याची सूचना आहे. प्रत्येक आठवड्यातील पॉझिटिव्ही रेट आणि उपलब्ध बेडच्या संख्येनुसार स्थानिक प्रशासन हा निर्णय घेणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here