Agriculture Department : राज्य शासनाच्या कृषी विभागास राष्ट्रीय स्तरावरील व्दितीय क्रमांकाचा “जैविक इंडिया ॲवार्ड 2023”

143
Agriculture Department : राज्य शासनाच्या कृषी विभागास राष्ट्रीय स्तरावरील व्दितीय क्रमांकाचा “जैविक इंडिया ॲवार्ड 2023”

इंटरनॅशनल कॉम्पीटन्स सेंटर फॉर ऑरगॅनिक ॲग्रीकल्चर (ICCOA), बेंगलुरु यांचेमार्फत सेंद्रिय शेती (Agriculture Department) आणि कृषी व्यवसायाला चालना देण्यात येते. सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती आणि कृषी व्यवसायाला चालना देणाऱ्या विशेष कार्य करणाऱ्या शासकीय संस्था, अशासकीय संस्था, शेतकरी, समूह, कंपन्या यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल राष्ट्रीय स्तरावरील “जैविक इंडिया ॲवार्ड” देण्यात येतो.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागास (Agriculture Department) राष्ट्रीय स्तरावरील व्दितीय क्रमांकाचा “जैविक इंडिया ॲवार्ड 2023” इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट, ग्रेटर नोएडा, नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. कृषी विभागाच्या वतीने दशरथ तांभाळे, कृषी संचालक, आत्मा, पुणे यांनी पुरस्कार स्विकारला. सदर पुरस्कार कृषी विभागांतर्गत “डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” या राज्य पुरस्कृत योजनेमध्ये सेंद्रिय शेती आणि कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.

(हेही वाचा – ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण अखेर मागे; मागण्यांची पूर्तता करण्याचे सरकारचे आश्वासन)

विदर्भातील आत्महत्याग्रस्त/नैराश्यग्रस्त अकोला, (Agriculture Department) अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा या 6 जिल्हयात वर्ष 2018-19 पासून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत 9,268 शेतकऱ्यांचे 15,682 हे क्षेत्र सेंद्रिय प्रमाणिकरणाखाली आणण्यात आले आहे. योजनेअंतर्गत 20 हे क्षेत्राचे 435 गट स्थापन करण्यात आले असून त्या गटांच्या 40 शेतकरी उत्पादक कंपन्या आणि त्यांचा महासंघ स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे एकूण रु. 2.82 कोटी भागभांडवल जमा झाले आहे. योजनेअंतर्गत 12 किरकोळ विक्री केंद्र, 17 समुह संकलन केंद्र, महासंघ ऑरगॅनिक मिशन (MOM) नावाचा ब्रँड तयार करण्यात आला असून सदर ब्रँडच्या नावाने सेंद्रिय शेतमालाची (Agriculture Department) विक्री करण्यात येते.

नैसर्गिक व सेंद्रिय शेती योजनेचा (Agriculture Department) लाभ घेण्यासाठी नजिकच्या तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हास्तरावर प्रकल्प संचालक, आत्मा यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन दशरथ तांभाळे, कृषी संचालक, आत्मा, पुणे यांनी केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.