नव्या वर्षात काही प्लॅन बनवताय? जाणून घ्या राज्य सरकारचे नवे निर्बंध

125

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गुरुवारी सुमारे साडेपाच हजार नवे कोरोना रुग्ण आढळल्याने सरकारची चिंता वाढली आहे. तसेच, ओमायक्रॅान रुग्णांची संख्यादेखील 450 वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईसह राज्यात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाकरे सरकारने रात्री उशिरा कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचा सुधारित आदेश जारी केला आहे.

हे आहेत नवे नियम

महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात नवीन निर्बंध लागू होतील, ज्या अंतर्गत बंद हॉल किंवा मोकळ्या जागेत लग्न समारंभात फक्त 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. त्याचप्रमाणे, सर्व प्रकारच्या सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी, मग ते बंद हॉलमध्ये असो किंवा मोकळ्या जागेत, अशा सर्व कार्यक्रमांना 50 पर्यंत लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. तसेच, अंतिम संस्कारासाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी आहे.

( हेही वाचा: शिक्षण विभागातील घोटाळ्यांचे सत्र सुरुच, आता शेकडो…)

निर्बंधांची अंमलबजावणी

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे, मोकळे मैदान याठिकाणी कलम 144 लागू होते.  याशिवाय राज्य सरकारने आधीच घातलेले निर्बंध कायम राहणार आहेत. गुरूवारी संध्याकाळी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत दिले होते, ज्याची रात्रीपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.