महिला कोणत्याही क्षेत्रात काम करणा-या असोत त्यांना घरच्या जबाबदा-याही पार पाडाव्या लागतात. त्यात जर त्यांचे कामाच्या वेळा जास्त असतील, तर अशावेळी घरच्या जबाबदा-या योग्यरित्या पार पाडणं महिलांना त्रासदायक ठरतं. त्यामुळेच महिला पोलिसांना आपल्या घरच्या जबाबदा-या पार पाडण्यास पुरेसा वेळ मिळावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांचे कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता महिला पोलिसांच्या कामाचा कालावधी 12 ऐवजी 8 तास करण्यात येणार आहे. त्यामुळे महिला पोलिसांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे.
(हेही वाचाः ‘या’ तारखेला वाजणार राज्यातल्या शाळांची घंटा! कुठल्या इयत्तांचे वर्ग सुरू होणार? वाचा)
ऑन ड्युटी 8 तास
राज्य सरकारने काढलेल्या नव्या आदेशानुसार आता महिला पोलिसांना फक्त आठ तास ड्युटी करावी लागणार आहे. शुक्रवारी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी ही घोषणा केली. या निर्णयामुळे घरच्या जबाबदा-यांसह आता या पोलिस महिलांना स्वत:ला वेळ देणेही शक्य होणार आहे.
सुप्रिया सुळेंनी केले निर्णयाचे स्वागत
याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून, यामुळे अनेक महिला पोलिस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Communityमहाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) September 24, 2021