लवकरच लोकल सुरु होणार

104

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी बंद असलेली लोकल आता लवकरच सुरु होणार असून, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसे संकेत दिले आहेत.

काय म्हणाले वडेट्टीवार

राज्यातील अर्थचक्र गतीमान करायचे असेल तर मुंबई पूर्वपदावर येणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकल ट्रेन सुरु झालीच पाहिजे. यासाठी राज्य सरकार अनुकूल असून, लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. याशिवाय, आंतरजिल्हा एसटी सेवा आणि कोचिंग क्लासेसही सुरु होण्याची शक्यता वडेट्टीवार यांनी वर्तविली.

07

लोकल सेवा सुरु करताना काही नियम आखून देण्याची गरज आहे. यादृष्टीने राज्य सरकार विचार करत असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. इतर नागरिकांना अद्याप ही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मुंबईलगतच्या परिसरातील चाकरमान्यांना नोकरी आणि उद्योगधंद्यासाठी शहरात येणे शक्य नाही. बेस्टची सेवा काहीप्रमाणात सुरु असली तरी प्रवाशांच्या प्रचंड संख्येमुळे यंत्रणेवर ताण येत आहे. या सगळ्यात नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.