देशभरात सप्टेंबर महिन्यापासून गोवरबाधितांचे रुग्ण वाढू लागले आहेत. या वाढत्या केसेसमध्ये बिहार, झारखंड खालोखाल महाराष्ट्र राज्यात गोवरबाधितांची संख्या वाढू लागली आहे. महाराष्ट्राचा देशभरात वाढत्या गोवरच्या केसेसच्या आकडेवारीत तिसरा क्रमांक लागला आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना काळात गोवर-रुबेलाच्या लसीकरणाची गती मंदावल्याची कबुली केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर वीणा धवन यांनी दिली. विलेपार्ले येथे गोवर-रुबेला लसीकरणाबाबत केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य विभाग तसेच युनिसेफच्यावतीने प्रसारमाध्यमांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
- न्यूमोनिया
- शरीरातील पाणी कमी होणे
- कानातून पस येणे
- श्वसनाचा त्रास होणे
पाच वर्षांखालील मुलांना गोवरचा विळखा
देशभरात कोरोना काळात जन्मलेली मुले सध्या गोवरच्या विळख्यात अडकल्याचे निरीक्षण केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अधिका-यांनी नोंदवले. देशभरात पंधरावयोगटापर्यंतही गोवरचे रुग्ण आढळले आहे. परंतु, त्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याची माहिती युनिसेफच्या अधिकारी डॉक्टर आशिष चौहान यांनी दिली.