राज्याच्या बारावीच्या (Hsc Exam 2024) विद्यार्थ्यांची बुधवार, २१ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु झाली आहे. राज्यातील १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चित्रीकरणही करण्यात येणार आहेत.
गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात एकूण २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. विज्ञान शाखेत ७ लाख ६० हजार ०४६ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत, तर कला शाखेटून ३ लाख ८१ हजार ९८२, 982, वाणिज्य शाखेतून ३ लाख २९ हजार ९०५, वोकेशनल शाखेतून ३७ हजार २२६, आय टी आय शाखेतून ४ हजार ७५० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांना लिखाणासाठी वेळ कमी पडू नये यासाठी शेवटची १० मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता बारावीसाठी एकूण ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कमी गुण मिळालेल्या अथवा यशस्वी न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जुलै महिन्यात पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.
परीक्षा सुरळीत होण्यासाठी उपाययोजना
विद्यार्थ्यांना परीक्षेची (Hsc Exam 2024) तयारी करता यावी यासाठी मंडळामार्फत सप्टेंबर महिन्यात संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. तर, परीक्षेचे अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात येऊन प्रवेशपत्र देखील ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्यात आले. परीक्षा निकोप व्हाव्यात, विद्यार्थ्यांचे परीक्षांबाबत दूरध्वनीद्वारे शंका समाधान व्हावे यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विभागीय मंडळ स्तरावर नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा देण्यात येत आहेत.
Join Our WhatsApp Community