Maharashtra HSC result: बारावीचा निकाल जाहीर;राज्याचा निकाल 94.22 टक्के; कोकण आघाडीवर तर मुंबईची घसरगुंडी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा बारावीचा निकाल 94.22 टक्के एवढा लागला आहे. सन 2020 च्या परीक्षेच्या तुलनेत यंदाच्या निकालात 3.56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुलांपेक्षा मुलींनी निकालात बाजी मारली आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक 97.21 टक्के तर सर्वात कमी मुंबई विभागाचा 90.91 टक्के एवढा आहे.

बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यातील 14 लाख 85 हजार 191 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती.

( हेही वाचा: ‘एसटी’तून प्रवास करताना अपघात झाल्यास; महामडंळ करणार मदत )

विभागीय मंडळनिहाय टक्केवारीत निकाल –

  • पुणे – 93.61
  • नागपूर – 96.52
  • औरंगाबाद – 94.97
  • मुंबई – 90.91
  • कोल्हापूर – 95.07
  • अमरावती – 96.34
  • नाशिक-95.03
  • लातूर-95.25
  • कोकण -97.22 .

निकाल –

मुले – 93.29 टक्के

मुली – 95.35 टक्के

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here