दहावी बारावीच्या निकालाची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिलेली असते. घरात बोर्डाचा विद्यार्थी असो वा नसो सगळ्यांचा निकालाकडे डोळा असतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्यात झालेल्या नानाविध राजकीय-सामाजिक घडामोडींमुळे या वर्षीचा निकाल उशीरा लागणार की काय अशी चिंता सगळ्यांना होती. पण आता ही चिंता कायमची मिटली आहे.
इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ दरम्यान झाली. लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या बहुप्रतिक्षीत परीक्षेचा निकाल २५ मे रोजी लागणार आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होणार आहे.
(हेही वाचा – Photographer : लाखो रुपयांची नोकरी सोडून फोटोग्राफी करणार्या अवलियला भेटा)
संकेतस्थळ क्रॅश होण्याआधी
एकाच वेळी लाखो विद्यार्थी शासनाच्या संकेतस्थळावर निकाल पाहातात. त्यामुळे संकेतस्थळावरचा भार वाढतो. याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे संकेतस्थळ क्रॅश होणे. दहावी-बारावीच्या निकालाच्या दिवाशी साईट क्रॅश होणे हे पालक-विद्यार्थ्यांसाठी नवीन नाही. त्यामुळे निकाल पाहाण्यासाठी लवकरता लवकर पुढील संकेतस्थळांवर जावे.
www.mahresult.nic.in
https://hscresult.mkcl.org/
https://hsc.mahresults.org.in
www.mahresult.nic.in
काही मिनिटांसाठी संकेतस्थळावर काहीच दिसले नाही तर घाबरून जाऊ नये. पुन्हा काही मिनिटांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community