धक्कादायक! रक्त वाया घालवण्यात महाराष्ट्र ठरतोय अग्रेसर!

कोरोना महामारीची पहिली लाट २०२० मध्ये आली, त्यामुळे जानेवारी ते मार्च २०२० या कालावधीत जे रक्त संकलित करण्यात आले होते, ते एप्रिल व मे महिन्यापर्यंत वाया गेले. कोरोना संसर्गामुळे देशात २०२० मध्ये ३ लाख ४३ हजार ७८३ युनिट रक्त वाया गेले असून, राज्यात हे रक्त वाया जाण्याचे प्रमाण १५ टक्के म्हणजे ५२ हजार ३६४ युनिट होते. या आकडेवारीनुसार देशात रक्त वाया घालवण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. महाराष्ट्र राज्याच्या मागोमाग पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यात सर्वाधिक रक्त वाया गेले आहे.

डीजीएचएस विभागाची माहिती

लॉकडाऊनबाबत कोणत्याच राज्यांना पूर्व कल्पना नव्हती. रक्त मुदतबाह्य होण्याचा कालावधी हा ३५ दिवसांचा असतो. मात्र या कालावधीमध्ये रक्त वापरले गेले नाही, तर त्यामध्ये काही घटकांचा समावेश करून हा कालावधी ४२ दिवसांपर्यंत नेता येतो. परंतु लॉकडाऊनच्या कालावधीत हे रक्त वाया गेले, महाराष्ट्रात रक्त वाया जाण्याचे प्रमाण ५२ हजार ३६४ युनिट तर, पश्चिम बंगाल, तामिळनाडू राज्यात रक्त वाया जाण्याचे प्रमाण अनुक्रमे ४५ हजार ८७२ व ४४ हजार ५५७ एवढे आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या डीजीएचएस विभागाने दिली आहे.

( हेही वाचा : नार्को टेररिझम  दहशतवादापेक्षाही  अधिक गंभीर! प्रवीण दीक्षित यांचे मत )

रक्त वाया जाऊ नये

रक्त साठवणूक केंद्रे वाढविणे, रक्तपेढ्यांनी एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करणे टाळून ठरावीक काळानंतर छोटी रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलन नियंत्रित करावे, रक्तपेढ्यांच्या साठ्यानुसार रक्तदान शिबिरे आयोजित करणे, तसेच छोट्या रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे अशा उपाययोजनांमुळे निश्चितपणे रक्त वाया जाणार नाही, तसेच रक्त साठ्यावर नियंत्रण मिळवण्यात यश येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here