देशातील आर्थिक राजधानी ज्या राज्यात आहे त्या महाराष्ट्रावर सर्वाधीक कर्जाचा बोजा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य सर्वाधिक कर्जबाजारी असल्याचा शिक्का बसला आहे. या कर्जानुसार राज्याच्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर २९ हजार ६६१ रुपये कर्ज आहे. तर राज्य सरकारच्या डोक्यावर तब्बल ३ लाख ३८ हजार ७३० कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे.
इतिहासातील सर्वात वाईट परिस्थिती
आर्थिक स्थितीबाबत एकेकाळी महाराष्ट्र सर्वाधिक चांगले प्रशासकीय राज्य म्हणून ओळखले जात होते; पण आता राज्याने ते स्थान गमावले आहे. कर्जबाजारी राज्यांच्या यादीत महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश २ लाख ४४ हजार कोटी, पश्चिम बंगाल २ लाख ११ हजार कोटी, आंध्र प्रदेश १ लाख ५ हजार कोटी, तामिळनाडू १ लाख ३ हजार कोटी आणि कर्नाटकवर १ लाख सतराशे हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. या आकडेवरूनच आपले राज्य सर्व स्तरावर अयशस्वी ठरल्याचे दिसून येते, असे वरिष्ठ प्रशासकीय अधिका-याने सांगितले आहे. राज्याला इतिहासातील सर्वांत वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कामगिरी न सुधारल्यास जागतिक वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत थांबण्याची भीती आहे, अशी शक्यता सरकारी अधिकाऱ्याने व्यक्त केली.
( हेही वाचा: दिलासादायक बातमी! देशातून घटतेय बेरोजगारी, वाचा कोणत्या राज्यात किती बेरोजगारी? )
देशातील पहिली पाच कर्जबाजारी राज्ये
- महाराष्ट्र
- पश्चिम बंगाल
- उत्तर प्रदेश
- आंध्र प्रदेश
- गुजरात
कोणत्या राज्यावर किती कर्जाचा बोजा
- महाराष्ट्र २.५३ लाख कोटी
- उत्तर प्रदेश रुपये २,४४५.१ अब्ज
- पश्चिम बंगाल रुपये २,११५.० अब्ज
- आंध्र प्रदेश रुपये १.५३८ अब्ज,
- गुजरात १५२८.९
- तामिळनाडू रुपये १.३२५ अब्ज
- कर्नाटक रुपये १.०१७ अब्ज.