कर्नाटकाला महाराष्ट्र देणार ‘जशास तसे’ उत्तर

122

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील गावे कर्नाटकात घेणार असल्याचे विधान करत आम्ही तेथील गावांना पाणी आणि इतर सुविधा पुरवल्या आहेत, असे सांगितले. त्यामुळे वाद पेटला आणि पुहा सीमाप्रश्न पेटला आहे. आता शिंदे सरकारने कर्नाटकाला जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. कर्नाटकने महाराष्ट्रातील 40 गावांवर दावा केल्यानंतर आता महाराष्ट्राने सीमाभागातील बेळगावसह 865 गावांतील संस्था आणि संघटनांना आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. या भागातील 865 गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था आणि संघटनांनादेखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगितले.

१० कोटींचा निधी देणार 

सीमाप्रश्नी नुकत्याच सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील मराठी बांधव आणि संस्था यांना महाराष्ट्राकडून अर्थसहाय देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुरुवारी या संबंधिचा शासन निर्णय जारी करण्यात आला. मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारातून राज्यातील विविध संस्था, संघटना यांना अर्थसहाय करण्याची तरतूद आहे. नव्या शासन निर्णयात यात सुधारणा करून आता सीमा भागातील 865 गावांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री धर्मादाय निधीसाठी पुढील वर्षासाठी म्हणजे 2023-24 सालासाठी 10 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.

(हेही वाचा रिचाने नवरा केला अली, तिची बुद्धी भ्रष्ट झाली…केला भारतीय सैनिकांचा अवमान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.