गंगावेस तालमीचा पठ्ठ्या सिकंदर शेखनं अखेर महाराष्ट्र केसरीचं मैदान मारलं. गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला चितपट करत सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे. मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेखचा सन्मान करण्यात आला. प्रदीपदादा कंद आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत सिंकदर शेख विजयी झाला आहे. (Maharashtra Kesari 2023)
पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेतील अखेरची लढत सिंकदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्यात झाली. यामध्ये सिंकदर शेखने मैदाम मारले. या स्पर्धेत ३६ जिल्हा आणि ६ महानगरपालिका असे ४२संघ भिडले. या स्पर्धेत ३६ जिल्हा आणि६ महानगरपालिका असे एकूण ४२ संघ सहभागी झाले होते. एका कुस्ती संघात गादी विभागातील १० आणि माती विभागातील १० असे एकूण २०कुस्तीगीर २ कुस्ती मार्गदर्शक आणि १ संघ व्यवस्थापक असे एकूण २३ जणांचा सहभाग होता. साधारण या कुस्ती स्पर्धेत ८४० कुस्तीगीर ८४ कुस्ती मार्गदर्शक आणि ४२ व्यवस्थापक, ८० पंच आणि ५० पदाधिकारी असे एकूण ११०० जणांचा सहभाग होता.
(हेही वाचा : Firecracker Stalls In Mumbai : दादरसह मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी पावलोपावली फटाक्यांचे स्टॉल्स)
अवघ्या साडे पाच सेकंदात ६६ व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला
कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अवघ्या साडे पाच सेकंदात ६६ व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला ५. ३७ सेकंदाला झोळी डावावर चितपट केले. अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरचे पारडे निश्चित जड होते. पण, शिवराज त्याला आव्हान देईल अशी अपेक्षा होती. मात्र, वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे शिवराजचा निभाव लागला नाही. लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदात सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळविला. पारितोषिक वितरणप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे, योगेश दोडके यावेळी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community