महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणारी ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ( Maharashtra Kesari) पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव येथे होणार आहे. १ ते ७ नोव्हेंबर या आठवड्यात स्पर्धा पार पडणार आहे. यंदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केसरी स्पर्धेला उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी दिली. यंदाच्या केसरी स्पर्धेत ४७ संघातील ९०० हून अधिक मल्ल सहभागी होणार आहेत. ६६ वी केसरी कुस्ती स्पर्धा नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या मैदानावर होणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही स्पर्धेत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आले आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदने खरी कुस्तीगीर परिषद आपलीच असल्याचा दावा केलाय. त्यामुळे महाराष्ट्र केसरीचा वाद यावर्षी पुन्हा निर्माण होणार आहे. बृजभुषण सिंह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कुस्ती महासंघाने शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली होती आणि भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कुस्तीगीर परिषदेला मान्यता दिली होती.
(हेही वाचा : Indian Air Force: C-295 मालवाहू विमानामुळे वायुदलाची ताकद वाढणार)
Join Our WhatsApp Community