महाराष्ट्रात सध्या फक्त 17 दिवसांचा कोळशाचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बत्ती गुल होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील वीज निर्मीती प्रकल्पांमध्ये कोळसा टंचाई निर्माण झाल्यामुळे राज्यावर आता भारनियमनाची दाट शक्यता असल्याचे वक्तव्य ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. सध्या राज्यात मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक भागात अघोषित लोडशेडींग सुरु आहे. उन्हाळा सुरु होताच लोडशेडिंग का केले जाते, काय अडथळा निर्माण होतात अशा प्रश्नांची उत्तरे नितीन राऊत यांनी दिली आहेत.
का निर्माण होते लोडशेडींगचे संकट?
उन्हाळ्यात वाढणा-या तापमानामुळे लोडशेडिंगचे संकट निर्माण होते. कोळशाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे प्लांट चालवणे जिकीराचे झाले आहे. प्रत्येक प्लांट चालावा असा आमचा प्रयत्न आहे. येणा-या पावसाळ्यासाठीही कोळशाची साठवण करावी लागते. त्यामुळे जेव्हा उष्णांक वाढतो तेव्हा ट्रान्सफ्राॅर्मही बंद पडण्याची भीती असते. अनेक ठिकाणी ते घडलेही आहे. असे नितीन राऊत म्हणाले.
( हेही वाचा: वीज दरवाढीचाही बसणार झटका! )
भारनियमन होणार?
कोळशाचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध होत नसल्याने, हे संकट गडद झाले आहे. कोळसा साठा उपलब्ध झाला, तर त्याची वाहतूक करण्यासाठी रेल्वे ट्रॅक उपलब्ध होत नसल्याचे म्हणत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्राकडे बोट दाखवले आहे. सध्या कोयना धरणार 17 TMC पाणीसाठा आहे. वीजनिर्मितीसाठी एका दिवसाला 1 TMC पाणी लागते. त्यानुसार 17 दिवसांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारनियम वाढण्याची शक्यता ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केली आहे.