राज्यभरात यावर्षी ४ हजार ४८१ हिवतापाचे (मलेरिया) (Maharashtra Malaria Fever) रुग्ण सापडले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण गडचिरोली, गोंदिया, मुंबई आणि ठाणे येथे आढळून येतात. मलेरियाला कारणीभूत ठरणाऱ्या डासांची संख्या नियंत्रणात नसल्याने या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होते.
यावर्षी जानेवारी ते १४ सप्टेंबरअखेर १० हजार रुग्ण आणि ६ जणांच्या मृत्यूचा झाला असून आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू २०२२ साली झाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
हिवताप (मलेरिया) हा डासांकडून फैलावणारा संसर्गजन्य आजार आहे. यामध्ये रुग्णाला थंडी वाजून ताप येतो. हिवतापामध्ये ठराविक वेळाने थंडी वाजते. थंडी वाजायची थांबल्यावर ताप येतो. डोके दुखते, स्नायूंमध्ये वेदना होतात, घाम येतो. त्यानंतर कोरडा खोकला आणि मळमळणे अशी प्रमुख लक्षणे दिसतात. सर्व प्रकारच्या हिवतापाचा प्रसार अॅनॉफेलीस वर्गीय डासांद्वारे होतो.
Join Our WhatsApp Community