गुढीपाडव्याच्या सण साजरा होत असताना सायंकाळी आकाशातून उल्कावर्षाव झाल्याचे अजब चित्र राज्यभरातून पाहायला मिळाले. विदर्भापासून ते रायगड, रत्नागिरीपर्यंत सर्वांनी हा विजेचा एकामागून एक येणारा वर्षाव अरबी समुद्राच्या दिशेने जाताना पाहिला. ही घटना संपूर्ण राज्यभरातून सायंकाळी पावणेआठच्या सुमारास दिसली.
सॅटलाईट पडल्याची शक्यता
ही घटना पाहताना आकाशात नेमके काय सुरु आहे, हीच कल्पना कित्येकांना आली नाही. जलदगतीने जमिनीच्या दिशेने एवढा मोठा आगीचा गोळा कोसळतोय, या आश्चर्यचकित भावनेनेच सर्व जण आकाशाकडे पाहत होते. हा प्रकार फारच निराळा आणि दुर्मिळ होता. आकाशातील एखादे सॅटलाईट पडल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. जमिनीवर पडताना सॅटलाईटचे तुकडे एकामागून एक कोसळले. विजेचा गडद रंग आणि आकाशातून जमिनीकडे कोसळण्याची पद्धत पाहता उपग्रह पडल्याची किंवा पाडल्याची शक्यता पर्यावरण अभ्यासक व ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपने यांनी व्यक्त केली. एकामागोमाग एक वीजेसदृश्य जमिनीवर पडणारी मोठी उल्काही असू शकते, असे ते म्हणाले. आज तीन उल्का पृथ्वीजवळून जाणार होत्या. उपग्रह किंवा सॅटलाईट कोसळल्याबाबत अद्यापही सरकारकडून दुजोरा दिला गेलेला नाही.
Join Our WhatsApp Community