ठाणे जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या वतीने महाराष्ट्र मिलिटरी स्कूल ठाणे येथे सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी ग्रामीण जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. (Maharashtra Military School) या स्पर्धांमध्ये मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या १७ वर्षांखालील विद्यार्थ्यांनी दमदार खेळी केली. या खेळांतून महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. फुटबॉलचे प्रशिक्षक अनिल शिंदेसर यांनी अल्पावधीत या सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करून घेतली. महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या संघाने मिळविलेल्या यशाबद्दल या शाळेचे विविध स्तरांवरून अभिनंदन करण्यात येत आहे. (Maharashtra Military School)
(हेही वाचा – RTO Officers Transfer : आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदल्या आता ऑनलाईन होणार; महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय)
स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, कार्यवाह रणजीत सावरकर, कोषाध्यक्ष सुरेश जाधव, संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर, हॉकीप्रशिक्षक राजेंद्र तिवारी, क्रीडा विभागातील सर्व प्रशिक्षक, सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्गाकडून विजयी संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे. (Maharashtra Military School)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community