महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून समोर आले आहे. राज्यात २०२१ साली एकूण ६ हजार १९० ज्येष्ठ नागरिकांसंबधित गुन्ह्याची नोंद झाली आहे. देशभरात ही संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येच्या प्रकरणात तामिळनाडू आघाडीवर असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.
६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारात गेल्या काही वर्षांपासून वाढ होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर मध्यप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो. २०२० मध्ये कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारीचा आलेख ढासळला होता. पण कोरोनानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारीमध्ये वाढ झाली.
(हेही वाचा दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचा मान कोणाला?)
मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, या यादीत मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२१ मध्ये मध्य प्रदेशमध्ये ५ हजार २७३ गुन्हे घडले, ज्यात पीडित ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजेच मध्य प्रदेशात दररोज १४ वृद्ध गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत. तेलंगणामध्ये २०२१ मध्ये १ हजार ९५२ प्रकरणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तामिळनाडूमध्ये २०२१ मध्ये १ हजार ८४१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये पीडित ज्येष्ठ नागरिक आहेत. दरम्यान, या बहुतांश घटनांमध्ये पोलिसांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.
Join Our WhatsApp Community