कोरोनाची तिसरी लाट राज्यात ओसरत आहे. कोरोना रुग्णांची घटती रुग्णसंख्या लक्षात घेता, राज्य सरकारने शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील शाळा हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. त्यातच आता पालकांच्या खिशाला कात्री लागणारी बातमी समोर आली आहे. डिझेल दरवाढ, कर्मचाऱ्यांचे वाढते पगार आणि 50 टक्के आसन क्षमतेने स्कूल बस सुरू होत असताना, आता स्कूल बसची 30 टक्के भाडेवाढ होणार असल्याची माहिती मिळाली आहे. शाळेत मुलांची उपस्थिती कमी आहे. तसेच आता परीक्षा झाल्या की, एप्रिल-मे महिन्यात सुट्ट्या लागणार आहेत. त्यामुळे दोन महिन्यांसाठी शुल्क वाढीचा निर्णय घेतला गेला आहे.
म्हणून शुल्क वाढीचा निर्णय
10 फेब्रुवारीपासून स्कूल बस सुरु होणार आहेत. मात्र स्कूल बसच्या आधीच्या शुल्कामध्ये 30 टक्के वाढ करण्याचा निर्णय बस मालक संघटनेने घेतला आहे. स्कूल बस पुन्हा एकदा शाळा सुरु झाल्यानंतर सुरू होत असताना मागील दोन वर्षांपासून बस बंद होत्या त्यामुळे मेंटेनन्स खर्च, कर्मचाऱ्यांचे वाढते पगार हे सगळं विचारात घेता स्कूल बस मालकांनी शुल्क वाढ करायचे ठरवले आहे, अस स्कूल बस मालक संघटनेचे सचिव रमेश मनियन यांनी सांगितले.
( हेही वाचा :टाटा चार्जिंग सेंटर कुणाच्या माध्यमातून उभारणार? जाणून घ्या…)