- प्रतिनिधी
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे आणखी सोपे होणार आहे. या संदर्भात आजारांचे पुनर्विलोकन, आजारांकरिता दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे आणि रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याच्या शिफारशी करणारी समिती स्थापन करण्यात आली आहे. यासाठी शासननिर्णय काढण्यात आला असून, याबाबत माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. (Maharashtra News)
(हेही वाचा – बांगलादेशी विरुद्ध विशेष पथकाने १२ Bangladeshi Citizens घेतले ताब्यात; ८ जणांना अटक)
तज्ञांची समिती
या समितीमध्ये संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (मुंबई) हे अध्यक्ष म्हणून कार्यरत असतील. समितीतील इतर सदस्यांमध्ये आरोग्य संचालनालय (मुंबई) चे संचालक, आयुष संचालनालय (मुंबई) चे संचालक, सर ज.जी रुग्णालय समूहाचे अधिष्ठाता, लोकमान्य टिळक स्मारक रुग्णालय (सायन) चे अधिष्ठाता, मुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. आनंद बंग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (मुंबई) चे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (मुंबई) यांचे माजी संचालक डॉ. तात्याराव लहाने, एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. रमाकांत देशपांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान (छत्रपती संभाजीनगर) चे सचिव डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, के.ई.एम रुग्णालय (मुंबई) चे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे, टाटा मेमोरियल सेंटर (परळ, मुंबई) चे संचालक अकॅडमी डॉ. श्रीपाद बनावली, कौशल्य धर्मादाय रुग्णालय (ठाणे) चे संचालक डॉ. संजय ओक, बॉम्बे हॉस्पिटल (मुंबई), नेफरोलॉजी विभागचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. बिच्छू श्रीरंग, पी.डी. हिंदुजा रुग्णालय (मुंबई) चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. जॉय चक्रवर्ती, नायर हॉस्पिटल (मुंबई) मधील ह्रदयविकार विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. अजय चौरसिया, बॉम्बे हॉस्पिटल (मुंबई) च्या कन्सल्टंट फिजिशियन अँड इंटेसिविस्ट डॉ. गौतम भन्साळी, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (नागपूर) चे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (पुणे) यांच्या हॉस्पिटल मॅनेजमेंट कमिटीचे सचिव डॉ. माधव भट यांचा समावेश आहे. या समितीचा प्रमुख उद्देश मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांसाठी योग्य प्रकारे वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करणे आहे. (Maharashtra News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community