राज्यातील पासपोर्ट कार्यालयात सध्या सर्व्हर डाऊन झाला आहे. पुणे, अमरावती, परभणी या पासपोर्ट कार्यालयांमध्ये सध्या प्रचंड गोंधळ उडाला आहे, कारण येथे सर्व्हर डाऊन असल्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच सर्व्हर डाऊन असल्याचे समजते आहे. पासपोर्ट कार्यालयांमध्ये अनेक ठिकाणी कामकाज ठप्प असल्याने नागिरकांचा खोळंबा झाला आहे. फक्त एक- दोन नव्हे तर राज्यातील अनेक पासपोर्ट कार्यालयांमध्ये सर्व्हर डाऊन असल्याचे, समोर आले आहे.