IPS Sudhakar Pathare यांचे अपघाती निधन; तेलंगणा जाताना काळाचा घाला

212

IPS Sudhakar Pathare : मुंबई पोलिस दलातील आयपीएस (IPS) अधिकारी डॉ. सुधाकर पठारेंचे अपघाती निधन झाले आहे. तेलंगणातील (Telangana) श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये IPS अधिकारी डॉ. सुधाकर पठारें यांच्यासह नातेवाईक भगवत खोडके (Bhagwat Khodke) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली आणि हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. (IPS Sudhakar Pathare)

(हेही वाचा – वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याबाबत CM Devendra Fadnavis काय म्हणाले?)

सुधाकर पठारे सध्या मुंबई पोलिसमध्ये पोर्ट झोनचे डीसीपी (DCP of the port zone) म्हणून कार्यरत होते. सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैदराबादमध्ये गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकासह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असता हा अपघात झाला. या अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती तेलंगणा पोलिसांना मुंबई पोलिसांना कळवली आहे. 

कोण होते सुधाकर पठारे?
स्पर्धा परीक्षा देत असताना 1995 साली ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. यानंतर 1996 साली विक्रीकर अधिकारी वर्ग 1 म्हणून त्यांची निवड झाली. 1998 साली पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलिस खात्यातच ते रमले. आतापर्यंत त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली आहे.

(हेही वाचा – म्यानमारमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; किती तीव्रतेचा होता Earthquake?)

राज्यात अनेक ठिकाणी सेवा बजावली
अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई तर पोलिस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे सेवा बजावली आहे. पोलिस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहर येथे सेवा बजावली आहे. एसपी डॉ. सुधाकर पठारे यांनी पोलीस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी (मोक्का), तडीपारी, एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईंचा धडाका लावला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच त्यांनी पोलिस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत. सुधाकर पठारे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.