गेल्या अनेक वर्षांपासून तरूण वर्ग पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहे. या पार्श्वभूमीवर आता २०२२ आणि २०२१ मधील तब्बल १४ हजार ९५६ रिक्तपदांची भरती पोलीस विभागात करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : भारताचा नेदरलॅंड्सवर दणदणीत विजय! गुणतालिकेतही अव्वलस्थानी झेप )
राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण १४ हजार ९५६ पदे भरली जाणार आहेत. ही भरती ३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तक माहिती policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अटी व नियम
- उमेदवाराला पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर सुरु होणार आहे.
- अर्ज सादर करण्याचा कालावधी – ३ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२
- उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू शकत नाहीत.
- उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.
परीक्षा पद्धत
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सर्वप्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये १०० पैकी ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहेत.
Join Our WhatsApp Community