आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्य पोलिस सेवेतील १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी (७ ऑगस्ट) संध्याकाळी यासंबंधीचे आदेश गृह विभागाकडून काढण्यात आले. यामध्ये पुणे शहरातून पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijayakumar Magar) यांची लातूर येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे प्राचार्य पदी बदली करण्यात आली. तसेच शहराला तीन नवे पोलिस उपायुक्त देखील मिळाले. (Maharashtra Police Transfer)
गोंदियाचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे (SP Nikhil Pingle), हिंगोलीचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर (SP G. shridhar) आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नांदेड परिक्षेत्राचे अधीक्षक राजकुमार शिंदे यांची पुणे पोलिस दलात पोलिस उपायुक्त पदी वर्णी लागली आहे. (Maharashtra Police Transfer)
(हेही वाचा – Minority Votes : अल्पसंख्यांक मतांसाठी महायुती सरकारकडून ‘मार्टी’ ची स्थापना)
ठाण्यातील उपायुक्त (वाहतूक) विनयकुमार राठोड यांची पोलीस अधिक्षक छत्रपती संभाजीनंगर (ग्रामीण) या पदावर बदली करण्यात आली आहे. याशिवाय महामार्ग विभागात कार्यरत मोहन दहिकर यांचीही ठाणे पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. एकूण १२ उपायुक्तांच्या बदलीचे आदेश गृहविभाकडून देण्यात आले आहेत. यापूर्वी मंगळवारी १६ उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. (Maharashtra Police Transfer)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community