कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यासंबंधी परिपत्रक (GR)राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच काढले आहे. कमी पट हे शैक्षणिकदृष्ट्या योग्य नाही, या मुद्द्यावर सरकारकडून जोर दिला जात आहे. मात्र शासनाच्या या धोरणामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आम्हाला मुलांना शिकवू द्या, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने (Maharashtra Primary Teachers Association) सोमवारी (२ऑक्टोबर) रोजी राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाची (aandolan) हाक दिली आहे. राज्यातील दोन लाख शिक्षक (2 lakhs Teachers)यानिमित्त रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती पुणे जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.पुण्यामध्ये (pune) हे आंदोलन होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली .
वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून समूह शाळा सुरू करण्याची शासनाची योजना चुकीची आहे. असे शिक्षक संघाचे म्हणणे आहे. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडून मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप सुरू असून, प्रशिक्षण व ऑनलाइन माहितीस शिक्षकांचा विरोध आहे. फंड प्रस्ताव व वैद्यकीय बिलांसाठी लागणारा विलंब तसेच पुरवणी बिलांसाठी वेळेवर तरतूद होत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.
(हेही वाचा : Afghanistan : अफगाणिस्तानचा भारतातील दूतावास बंद; सांगितली ‘ही’ कारणे)
सध्या प्राथमिक शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकांना वेळ मिळत नसल्याने सरकारी शाळा धोक्यात आल्या आहेत. विविध प्रकारची माहिती शिक्षकांकडून मागविली जात आहे. राज्य शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, डायट, जिल्हा परिषद अशा वेगवेगळ्या स्तरावरून शिक्षकांना कागदी घोडे नाचवण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामुळे शिक्षक त्रस्त असल्याचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे म्हणाले.
हेही पहा –