अखेर एमपीएससी 2019चा निकाल जाहीर! ‘या’ पदांच्या अर्ज भरतीचीही मुदत वाढवली

119

राज्यसेवा व गट-क मुख्य परीक्षा 2019चा अंतिम निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आला आहे. आयोगाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. यासोबतच 2020च्या राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत देखील वाढवण्यात आल्याचे आयोगाने ट्वीट करत म्हटले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

या परीक्षांसाठी निकाल जाहीर

एमपीएससीच्या एकूण 413 पदांसाठी 2019 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या पदांसाठीचा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी एमपीएससी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्यासोबतच महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019- लिपिक टंकलेखक परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी देखील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

यासोबतच आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 व महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 यांसाठी अर्ज सादर करण्यास दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 12 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हा निकाल पाहता येणार आहे.

रिक्त पदे लवकरच भरणार

राज्यात एमपीएससी पदांच्या रिक्त जागांचा प्रश्न प्रलंबित असताना ही भरती करण्यावर राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 23 सप्टेंबर रोजी सांगितले. राज्यातील एमपीएससी रिक्त पदे भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या कार्यवाही नंतर जागांच्या जाहिराती जाहीर केल्या जातील, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.