पुढचे दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अनेक राज्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनानेही खबरदारीची पावले उचलायला सुरुवात केली आहे. ज्या जिल्ह्यांत रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तिथे शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारी ठाणे, पालघर, रायगड येथील शाळा बंद असणार आहेत, तर पुणे जिल्ह्यातील शाळा 17 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.
( हेही वाचा: वीकेंडला फिरायला जाताय? गडकिल्ले, पर्यटनस्थळांवर या तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू )
कुठे कुठे शाळा बंद
- पुणे जिल्ह्यातील 9 तालुक्यांतील शाळांना पुढचे तीन दिवस सुट्टी ( पुण्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, हवेली, मुळशी, मावळ, बारामती, भोर, वेल्हेमधील शाळा बंद)
- ठाणे जिल्ह्यातील शाळा 15 आणि 16 जुलैला बंद राहणार.
- नवी मुंबईतील शाळांना 15 जुलैला सुट्टी देण्यात आली आहे.
- पनवेलमधील शाळा 2 दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत.
- वसईमधील शाळा 15 जुलैला बंद राहणार आहेत.
- रायगडमधील सर्व शाळांना पावसामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
- नांदेड जिल्ह्यातील शाळांनाही मुसळधार पावसामुळे सुट्टी जाहीर.
- पिंपरी चिंचवडमधील शाळा अतिवृष्टीमुळे बंद