हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबईसह (Mumbai Rain) उपनगरीय क्षेत्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Maharashtra Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, कोकणातही मान्सूनच्या दृष्टीनं पूरक स्थिती निर्माण झाली असून, उत्तर कोकणाला पावसाचा तडाखा बसताना दिसणार आहे. फक्त कोकणच नव्हे, तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावरील परिसरामध्येही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain)
(हेही वाचा –MPSC : अतिवृष्टीमुळे अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांकरिता ‘या’ दिवशी होणार टंकलेखन कौशल्य चाचणी)
गुजरातपासून केरळपर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे थेट परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होताना दिसत आहेत. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या काळ्या ढगांची चादर पाहायला मिळत असून, यादरम्यान जोरदार पाऊसधारा काही ठिकाणी अडचणी वाढवताना दिसत आहेत. मागील 24 तासांपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संततधार पाहायला मिळाली. ज्यानंतर गुरुवारी रात्रीपासूनच शहराच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली. दरम्यान, शहरात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. (Maharashtra Rain)
(हेही वाचा –Mumbai Koliwada: मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासासाठी सीमांकन प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार)
राज्यातील पावसाचे एकंदर तालरंग पाहता हवामान विभागानं ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुण्यातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, नाशिक, मुंबई, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात परिस्थिती वेगळी नाही. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. राजस्थानपासून पश्चिम बंगालपर्यंत मान्सून सक्रिय झाला असून, त्यामुळं उत्तर मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होताना दिसत आहे. (Maharashtra Rain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community