Maharashtra Rain: मुंबई, कोकणासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

60
Maharashtra Rain: मुंबई, कोकणासह 'या' जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
Maharashtra Rain: मुंबई, कोकणासह 'या' जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

ऑक्टोबर महिन्यातही पावसाचे सावट कायम असून हवामान खात्याने मुंबईसह (Maharashtra Rain) पाच जिल्ह्यांना पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट दिला आहे. मुंबई आणि ठाण्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील शेतकऱ्यांची भात कापणी सुरू असताना या पावसाने त्यांची चिंता वाढवली आहे. (Maharashtra Rain)

(हेही वाचा-Assembly Election : आताही नवीन मतदार नोंदणी करता येईल का? सविस्तर माहिती एका क्लिकवर)

राज्याच्या इतर भागांमध्येही पावसाचा प्रभाव राहणार आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जोरदार वाऱ्यांसह पाऊस होण्याचीही शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Rain)

(हेही वाचा-CM Yogi Adityanath बनले गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ; किती गुंडांना ठार केले जाणून घ्या…)

मराठवाड्यातील जालना, परभणी, आणि हिंगोलीमध्येही हलक्या पावसाची शक्यता असून रविवारपर्यंत त्यात वाढ होऊ शकते. (Maharashtra Rain)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.