Maharashtra Rain : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता, ‘वेगरिज ऑफ दी वेदर’ची माहिती

216
Maharashtra Rain : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता, ‘वेगरिज ऑफ दी वेदर’ची माहिती

एकीकडे मुंबईत प्रदूषणाने नागरिक हैराण झाले आहेत तर दुसरीकडे ऐन दिवाळीत (Maharashtra Rain) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत तोंडावर मास्क आणि कदाचित आता छत्री घेऊन फिरावं लागणार आहे.

अधिक माहितीनुसार, राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३५ अंश असून, किमान तापमान १५ अंशाच्या आसपास आहे. हवामान स्थिर असतानाच येत्या आठवड्याच्या शेवटी दक्षिण महाराष्ट्रात (Maharashtra Rain) काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशी माहिती हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या ‘वेगरिज ऑफ दी वेदर’ या संस्थेने दिली आहे.

(हेही वाचा – Ratan Dubey : खळबळजनक! भर सभेत नक्षलवाद्यांनी केली भाजप नेत्याची निघृण हत्या)

अशातच ४ नोव्हेंबर शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३६.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, ऑक्टोबरच्या उत्तरार्धात पडलेली थंडी वगळता मुंबईचा पारा आता चढाच आहे. तर राज्यातही तापमान फार काही खाली घसरलेले नाही. (Maharashtra Rain)

कमाल तापमान

अलिबाग – ३५.४
डहाणू – ३६.८
मुंबई – ३६.८
रत्नागिरी – ३६.६
सोलापूर – ३४.४
सातारा – ३२.६
सांगली – ३२
परभणी – ३२.६
नांदेड – ३२.८
कोल्हापूर – ३२.३
जळगाव – ३३.६

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.