फेंगल चक्रीवादळाने (Cyclone Fengal) भारतातील दक्षिणेतील राज्यांना (Weather Update) तडाखा दिला आहे. येथील किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मोठा फटका बसला. आता या चक्रीवादळाने महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) थंडीचा जोर कमी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. तर मुंबईत हलक्या पावसाच्या सरी सुरू आहेत. हिवाळ्यात पावसाचे आगमन झाल्याने मुंबईकर (Mumbai Rain) गोंधळले आहेत. (Maharashtra Rain)
बुधवारी राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही काही भागात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होता. आता आज पावसाचा जोर काहीसा वाढणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही तडाखा दिला असून येत्या 24 तासांत कमी दाबाचा पट्टा कमकूवत होणार असल्याचंही हवामान विभागानं सांगितलंय. (Maharashtra Rain)
हेही वाचा- Pune Drug Case: उच्चशिक्षित तरुणांकडून ड्रग्जची विक्री; तिघांना अटक
तळ कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा काहीसा वाढला आहे. किनारपट्टी भागात दमटपणा वाढला असून उकाडा जाणवत आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही दिवसांपूर्वी पडलेला गारठा गायब झाला आहे. किमान तापमानात वाढ झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढ पहायला मिळाली. (Maharashtra Rain)
हेही वाचा- BMC : बालवाडीतील मुलांना मिळणार जादुई पिटारा
5 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात कोकणातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार असून पुणे व सातारा घाट परिसरात मुसळधार पाऊस राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. मध्य महाराष्ट्रात आज पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात हलक्या सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain)
हेही वाचा- Fact Check : अपूर्ण आकडेवारी जाहीर करून महाराष्ट्रात EVM घोटाळा झाल्याचा अपप्रचार
मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला असून बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. उत्तर भारतातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी घेऊन येणारे थंड व कोरड्या उत्तरी वाऱ्यांना, बं उपसागरातून ‘फिंजल’ चक्रीवादळाच्या वाऱ्यांना पूर्वे दिशेकडून लोटलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे अटकाव केला गेल्यानं व दमटपणा काहीसा वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community