विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं दडी मारली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.
शेतकऱ्यांना सध्या चांगल्या पावसाची गरज आहे, कारण खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.
(हेही वाचा – Simona Halep Banned : महिला टेनिसपटू सिमोना हालेपवर उत्तेजक चाचणी नियम उल्लंघना प्रकरणी ४ वर्षांची बंदी)
राज्यातील काही भागात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’देण्यात आला आहे. त्यामुळे उद्या, 14 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणातही जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक ते कोल्हापूरपर्यंतच्या पाचही जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community