राज्यात कमी झालेला पावसाचा जोर (Heavy Rain) रविवारपासून पुन्हा पाहायला मिळणार आहे. राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी (०८ सप्टेंबर) राज्यात कुठं ऑरेंज (Orange alert) तर कुठं यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागानं (IMD) सावधानतेचा इशारा दिला आहे. जाणून घेऊयात हवामान विभागाचा अंदाज आहे. (Maharashtra Rain)
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे पालघर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. (Maharashtra Rain)
(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : गणपतीची आरती करूया; आक्रस्ताळा गोंधळ नको !!)
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात ७ ते ९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात ९ सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना ७ ते ९ सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Rain)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community