Maharashtra Rain : राज्यात पावसाची विश्रांती; आज २६ जुलै रोजी ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

164
Maharashtra Rain : राज्यात पावसाची विश्रांती; आज २६ जुलै रोजी 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Rain : राज्यात पावसाची विश्रांती; आज २६ जुलै रोजी 'या' जिल्ह्यांना अलर्ट

राज्याच्या (Maharashtra Rain) विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर 27 जुलैपर्यंत कायम राहणार असल्याचा आंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 25-27 जुलैपर्यंत राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस बरसणार आहे, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

गुरुवारी 25 जुलैरोजी मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला. पुण्यात अवघ्या काही तास झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूरमध्ये पंचगंगेने धोका पातळी ओलांडली होती. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले होते. तर, कल्याणमध्येही उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडल्याने शहरात नदीचे पाणी शिरले होते. आजही हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Rain)

25 जुलै ते 27 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. आजही हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे. 27 जुलैनंतर पावसाचा जोर ओसरू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.