राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली असून, धरण क्षेत्रात चांगला पाऊस बरसत आहे. मात्र यामुळे विविध भागांत निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे आतापर्यंत तब्बल ९९ जणांचा बळी गेला आहे, तर १८१ जनावरे दगावल्याची माहिती आहे. तर आतापर्यंत ७,९६३ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पूरस्थितीचा सामना आणि बचाव कार्यासाठी एकूण १४ एनडीआरएफ आणि ६ एसडीआरएफ पथके तैनात आहेत. शुक्रवारी पावसाचा जोर कमी असला तरी अनेक नद्यांमधून पाण्याचा जोर ओसरलेला नाही. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा कायम आहे.
( हेही वाचा: संसद भवन परिसरात आता आंदोलने, निदर्शने आणि धार्मिक विधी करण्यास मनाई )
NDRF आणि SDRF ची पथके तैनात
यामध्ये कांजुरमार्ग, घाटकोपर येथे प्रत्येकी १-१, पालघर १, महाड २, ठाणे २, रत्नागिरी-चिपळूण २, कोल्हापूर २, सातारा १, सिंधुदुर्ग १, गडचिरोली १, अशी एकूण १४ एनडीआरएफ पथके, तसेच नांदेड १, गडचिरोली २, नाशिक १, भंडारा १, नागपूर १, अशी एसडीआरएफची ६ पथके तैनात करण्यात आली आहेत.
Join Our WhatsApp Community