![Maharashtra Rajya Bharat Scouts And Guides च्या विद्यार्थ्यांची स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट Maharashtra Rajya Bharat Scouts And Guides च्या विद्यार्थ्यांची स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/Swatantryaveer-Savarkar-696x377.webp)
महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्सच्या (Maharashtra Rajya Bharat Scouts And Guides ) विद्यार्थ्यांनी दि. ११ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) भेट दिली. महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स मार्फत राज्य पुरस्कार चाचणी शिबिरासाठी ११४ मुलींची निवड करण्यात आली होती. दि. ९ फेब्रुवारीपासून हे चाचणी शिबिर सुरु असून अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थीनींसाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीत रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यामधील विद्यार्थीनींचा समावेश होता.
( हेही वाचा : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात DCM Eknath Shinde यांचा समावेश)
स्मारकाला भेट देऊन विद्यार्थीनींमध्ये महापुरूषांचे विचार रुजवण्यासाठी ही अभ्यासभेट आयोजित करण्यात आली होती, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्सच्या (Maharashtra Rajya Bharat Scouts And Guides ) जिल्हा संघटक हेमांगी पाटील (Hemangi Patil) यांनी दिली. तर ठाणे जिल्ह्याच्या ट्रेनिंग कमिशनर पुष्पा जगताप (Pushpa Jagtap) म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य असाच आहे. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिल्याने विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याविषयी जाणून घेता आले, असेही जगताप म्हणाल्या.
![Maharashtra Rajya Bharat Scouts And Guides च्या विद्यार्थ्यांची स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट 1 Maharashtra Rajya Bharat Scouts And Guides च्या विद्यार्थ्यांची स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/Swatantryaveer-Savarkar-1.webp)
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) दिलेल्या भेटीमुळे वीर सावरकरांचा इतिहास जाणून घेता आला. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी केलेले कार्य जाणून घेण्याची संधी आम्हाला मिळाली, त्यासाठी आम्ही स्माराकाचे आणि महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्सचे (Maharashtra Rajya Bharat Scouts And Guides ) आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया विद्यार्थीनी साक्षी घुले (Sakshi Ghule) हिने दिली.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community