राज्यात गेल्या एका वर्षात २ लाख ३० हजार नवीन क्षयरोगाच्या (TB) रुगणांची नोंद करण्यात आली आहे. त्याआधी क्षयरोगाच्या (Tuberculosis) २ लाख २३ हजार रुग्णांची नोंद गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास १० हजारांपर्यंत अधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत. गेल्या चार वर्षात, एकूण क्षयरोग प्रकरणांपैकी मल्टी ड्रग रेझिस्टंट (Multiple drug resistance) क्षयरोग प्रकरणांची टक्केवारी चार टक्क्यांपेक्षा वाढली आहे.
( हेही वाचा : Sahitya Akademi च्या साहित्य उत्सवाचे 7 ते 12 मार्च दरम्यान दिल्लीत भव्य आयोजन)
राज्यात नोंदवल्या गेल्या २ लाख ३० हजार रुग्णांपैकी एक लाख १७ हजार रुग्ण शासकीय रुग्णालयांमधून आणि १ लाख १३ हजार रुग्ण खासगी रुग्णालयांमधून नोंदवले गेले. एकूण रुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण ५६ टक्के आणि महिलांचे प्रमाण ४४ टक्के आहे. तसेच ५ टक्के रुग्ण १४ वर्षांपेक्षा कमी वर्षे वयोगटातील आहेत. (TB)
यासंदर्भात आरोग्य सहसंचालक (क्षयरोग आणि कुष्ठरोग) डॉ. संदीप सांगळे (Dr. Sandeep Sangle) म्हणाले, टीबीच्या (TB) नोंदणीच्या बाबतीत महाराष्ट्र (Maharashtra) आघाडीवर आहे. जास्तीत जास्त रुग्णांची नोंद झाल्याने उपचारांवर भर देणे शक्य होत आहे. टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत पोर्टेबल एक्सरे मिळाले असून दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. टीबीमुक्त भारत अभियानाचे उद्दिष्ट गाठायचे असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. (TB)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community