महाराष्ट्राला वाढला तिसऱ्या लाटेचा धोका! डेल्टा प्लस पसरतोय!

राज्यात डेल्टा प्लसची रुग्ण संख्या ६६ वर पोहचली आहे, त्यातील ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

90

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर राज्य सरकारने राज्यभरात कोरोनासंबंधीचे निर्बंध  रविवार, १५ ऑगस्टपासून शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबईत सर्वसाधारण नागरिकांनाही लोकल प्रवासाला परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे सण-उत्सवांमध्ये वाढती गर्दी ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे निमंत्रण असणार आहे का, अशी शक्यता आहे. कारण राज्यात डेल्टा प्लसची रुग्ण संख्या ६६ वर पोहचली आहे, त्यातील ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतलेले १० रुग्ण  

राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात आता डेल्टा प्लसची रुग्णसंख्या राज्यात ६६ वर पोहोचली असून जळगावात सर्वाधिक १३ रुग्ण आहे. तर १९ ते ४५ वयोगटात सर्वाधिक लागण झाली आहे. महिला आणि पुरुष रुग्णाची संख्या जवळपास सारखी आहे. विशेष म्हणजे या रुग्ण संख्येत ज्या रुग्णांनी दोन्ही डोस घेतले आहेत असे १० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. उर्वरीत ३१ रुग्णांना कुठलेही लक्षण आढळून आले नाही. लसीकरण पूर्ण केलेल्या १० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील २ रत्नागिरी, मुंबई, बीड आणि रायगड येथे प्रत्येकी १ रुग्ण संख्या आहे. रत्नागिरीतील ८० वर्षीय महिला ही राज्यातील डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण आढळून आला, तर मुंबई, घाटकोपर येथील ६३ वर्षीय महिला जिने लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते, तिला डेल्टा प्लसची लागण झाली, असा राज्यातील पहिला रुग्ण होता. या महिलेचा २७ जुलै रोजी मृत्यू झाला. या महिलेच्या संपर्कात आलेल्या २ जणांनाही डेल्टा प्लसची लागण झाली आहे.

(हेही वाचा : मिलिंद नार्वेकरांना धमकी! ईडी, सीबीआय मागे लावू!)

कोरोना रुग्ण घटले, डेल्टा प्लेसचे वाढले!

राज्यात जरी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी डेल्टा प्लेसचे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. सध्या राज्यात ५ हजार ८६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज राज्यात ६ हजार ६८६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर १५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ६३ हजार ४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

कसा आहे डेल्टा प्लस विषाणू? 

डेल्टा प्लस हा डेल्टा किंवा ‘बी1.617.2’ याचे भीषण रुप आहे. हा व्हेरियंट प्रथमच भारतात आढळला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी हाच व्हेरियंट जबाबदार होता. व्हायरसच्या या नव्या प्रकारामुळे कोरोना किती घातक होऊ शकतो, याचा अंदाज अद्याप लावता आलेला नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.