Online RTO Service: फक्त Licence नाही, तर या सुविधाही आता ऑनलाईन मिळणार

119

नागरिकांचे काम झटपट करण्यासाठी सरकारकडून अनेक सुविधा ऑनलाईन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आधार क्रमांकाचा वापर करुन आरटीओकडून देण्यात येणा-या सेवा या ऑनलाईन पद्धतीने देण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता राज्य परिवहन विभागाकडून 18 सेवा ऑनलाईन करण्यात आल्या असून, याद्वारे घरबसल्या लायसन्स रिन्यूअल तसेच वाहनाच्या RC Book मधील पत्ता बदलणे सहज शक्य होणार आहे.

या सुविधा मिळणार ऑनलाईन

एका राज्यातून दुस-या राज्यात जाण्यासाठी चालकांना लागणारे एनओसी प्रमाणपत्र, डुप्लिकेट नोंदणी, लायसन्स रिन्यूअल तसेच वाहनाच्या आर.सी. बूक मधील पत्ता आता ऑनलाईन बदलता येणार आहे. यासाठी आता वाहनधारकांना आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून या फेसलेस सेवांचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले.

(हेही वाचाः IRCTC Rules:ट्रेनच्या प्रवासाला आता विमानाचा नियम, इतक्याच वजनाचं लगेज फ्रीमध्ये नेता येणार)

लाखो लोकांना होणार फायदा

यामुळे तब्बल 17 ते 18 लाख वाहनधारकांना फायदा होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. राज्यात दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र(Secondary registration certificate)साठी दरवर्षाला साधारण 1 लाखाहून अधिक अर्ज येत असतात. त्यामुळे आधार क्रमांकाचा वापर करत ही प्रक्रिया आता ऑनलाईन होणार आहे. तसेच आर.सी.बूक आणि लायसन्स वरील पत्त्यात बदल करणे, लायसन्स रिन्यू करणे या सेवांसाठी आता आरटीओ ऑफिसच्या घिरट्या घालण्याची आवश्यकता नाही.

(हेही वाचाः आता Credit Card चे बिल तुमच्या सोयीनुसार भरा, RBI चा मोठा निर्णय)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.