Shiv Jayanti 2024 : ‘जय जय जय शिवाजी’च्या गजराने महाराष्ट्र सदन दुमदुमले; शिवजयंती उत्साहात साजरी

भव्य महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा केला. यानंतर पालखी पूजन करण्यात आले.

174
Shiv Jayanti 2024 : आग्रा किल्ल्यात शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती (Shiv Jayanti 2024) सोहळ्यातील ढोल-ताशांचे दिमाखदार सादरीकरण आणि जोडीला ‘जय भवानी, जय शिवाजी’ या उत्स्फुर्त घोषणांमुळे सोमवारी (१९ फेब्रुवारी) राजधानीतील ल्युटियन दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचा परिसर दुमदुमला. (Shiv Jayanti 2024)

शिवजयंती (Shiv Jayanti 2024) राष्ट्रोत्सव समिती दिल्लीच्या वतीने महाराष्ट्र सदनात सोमवारी शिवजयंती (Shiv Jayanti 2024) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भव्य महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात (Shiv Jayanti 2024) सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा केला. यानंतर पालखी पूजन करण्यात आले. (Shiv Jayanti 2024)

(हेही वाचा – Bangladeshi Held in Panvel : बांगलादेशी अस्लम बनला रंजन दास; एटीएसने केला भांडाफोड)

महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी स्थापित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) अर्धाकृती पुतळ्याला छत्रपती परिवारातील सदस्य, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदर सिंग, अप्पर निवासी आयुक्ती निवा जैन, सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व दिल्ली राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. (Shiv Jayanti 2024)

ढोल ताशांचे सादरीकरण ठरले आकर्षण

ढोल ताशांच्या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले होते आणि सोबतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) घोषणेने वातारवण निनादून गेले होते. शिवराय ढोल पथक, नाशिक येथील ३० वादकांच्या ढोल पथकात सहभागी तरुणाईंचा उत्साह व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या वाद्यवृदांच्या सादरीकरणाने उपस्थितांना ठेका धरायला लावला. (Shiv Jayanti 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.