महाराष्ट्राची चिंता वाढली; H3N2 व्हायरसचा दुसरा बळी; कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ

206

राज्यात सध्या H3N2 व्हायरसचा प्रसार वाढत आहे. श्वसनासंबंधी असलेल्या या आजाराचा अनेकांना संसर्ग जडला आहे. याच आजारामुळे महाराष्ट्रात २ जणांचा बळी गेला आहे. पहिला बळी पिंपरी-चिंचवड येथे झाला होता, आता दुसरा बळी पुण्यातील भोसरी येथे झाला आहे. एका ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचा या आजारामुळे मृत्यू झाला.

जीवघेण्या H3N2 व्हायरसने देशभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. भोसरीतील वृद्धाला या व्हायरसची लागण झाली होती. त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या वृद्धाला फुप्फुस आणि ह्रदयाचे आजारदेखील होते. या विषाणूंच्या रुग्णांसाठी शहरातील पाच रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १० आयसोलोशन वॅार्ड राखीव ठेवण्यात आले आहेत, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. याआधी छत्रपती संभाजीनगर येथून वैद्यकीय शिक्षणासाठी अहमदनगरमध्ये आलेल्या एका तरुणाचा H3N2 व्हायरसची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे राज्यातील झालेला हा पहिला मृत्यू होता. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. आता पिंपरी – चिंचवडमधील H3N2 व्हायरसचा हा महाराष्ट्रातील दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू आहे. छत्रपती संभाजीनगरमधील २३ वर्षीय तरुण अहमदनगरजवळील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेला होता. काही दिवसांपूर्वी तो कोकणात सहलीला जाऊन आला होता. त्यानंतर तो आजारी पडला. त्याला तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत त्याला कोविडची बाधा झाल्याचे आढळून आले. सोबतच त्याची H3N2 इन्फ्लुएन्झाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू होते.

(हेही वाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या विरोधात लागेल असे समजूनच…संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य)

कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ 

महाराष्ट्रात ८ मार्च रोजी कोरोनाचे ३३५ रुग्ण आढळून आले होते, मात्र एक आठवड्यानंतर ही रुग्ण संख्या ६६८ पर्यंत वाढली. यात सर्वाधिक पुण्यात २२२, पुण्यात १३०, ठाणे ११७ मुंबई उपनगर ३१, नाशिक २६, अहमदनगर २३ आणि नागपूरमध्ये १७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.