Maharashtra SSC Result 2024: ऑल द बेस्ट! दहावीच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरु

169
Maharashtra SSC Result 2024: ऑल द बेस्ट! दहावीच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरु
Maharashtra SSC Result 2024: ऑल द बेस्ट! दहावीच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरु

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण (Maharashtra SSC Result 2024) मंडळाकडून (MSBSHSE) आज (27 मे) दहावीचा निकाल (SSC Result 2024) जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra SSC Exam Result 2024) अधिकृत वेबसाईटवर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. तर अकरावीची पूर्व प्रवेश प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. (Maharashtra SSC Result 2024)

विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पत्रकार परिषद घेतली जाईल. पत्रकार परिषदेतून निकालासंदर्भातील (Maharashtra SSC Result 2024) ठळक माहिती दिली जाईल. शैक्षणिक वर्ष 2023 -2024 मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Maharashtra SSC Result 2024)

निकाल कुठे पाहाल?

  • https://mahresult.nic.in
  • http://sscresult.mkcl.org
  • https://sscresult.mahahsscboard.in
  • https://results.digilocker.gov.in
  • https://results.targetpublications.org/

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.