Maharashtra SSC result 2024: दहावीच्या निकालात कोकण विभात यंदाही आघाडीवर तर लातूर पॅटर्न पिछाडीवर 

यावर्षी १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर गतवर्षी पेक्षा १.९८ टक्के निकाल जास्त लागला आहे.

228
SSC Result 2024 : महानगरपालिका शाळांचे विद्यार्थी हुशार, दहावी परीक्षेचा निकाल ९१.५६ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रात यावर्षी दहावीचा एकूण ९५.८१ टक्के निकाल लागला आहे तर या वर्षी १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर गतवर्षी पेक्षा १.९८ टक्के निकाल जास्त लागला आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.   (Maharashtra SSC result 2024)

दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाने (Konkan Division) यंदाही बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९९.०१ टक्के लागला आहे. तुलनेने सर्वात कमी निकाल नागपूर (Nagpur Division) मंडळाचा ९४.७३ टक्के एवढा लागला आहे. दुसरा क्रमांक कोल्हापूर (Kolhapur Division) ९७.४५, पुणे (Pune Division) ९६.४४ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई- ९५.८३, अमरावती- ९५.५८, नाशिक ९५.२८, लातूर ९५.२७, छत्रपती संभाजीनगर ९५.१९ या मंडळाचा क्रमांक लागतो. 

(हेही वाचा – शरद पवारांना वाटणाऱ्या भीतीमुळे राष्ट्रवादीचा 2004 मध्ये मुख्यमंत्री झाला नाही; Ajit Pawar यांचा गौप्यस्फोट)

राज्यातील ९ हजार ३८२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर त्यापैकी १८७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर सर्वाधित संख्या लातूर जिल्ह्यातील असून १२३ विद्यार्थी हे १०० टक्के गुणाने उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के  तर मुले ९४.५६ टक्के एवढे आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २.६५ टक्के जास्त आहे.

परीक्षा कालावधीत ५ हजार ८६ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले होते. राज्यातील २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधील १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यामध्ये ८ लाख ५९ हजार ४७८ विद्यार्थ्यांसह ७ लाख ४९ हजार ९११ विद्यार्थिनी आणि ५६ तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचा समावेश होता.  (Maharashtra SSC result 2024)

(हेही वाचा – SBI बँकेच्या खातेदारांची फसवणूक; खोटे संदेश पाठवून लुबाडणूक)

विभागनिहाय निकाल (टक्केवारी)
  • कोकण : ९९.०१ टक्के 
  • पुणे : ९६.४४ टक्के 
  • नागपूर : ९४.७३ टक्के 
  • छत्रपती संभाजीनगर : ९५.१९ टक्के 
  • मुंबई : ९५.८३ टक्के 
  • कोल्हापूर : ९७.४५ टक्के 
  • अमरावती :  ९५.५८ टक्के 
  • नाशिक : ९५.२८ टक्के 
  •  लातूर : ९५.२७ टक्के  

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.