दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा नियोजित आहे. ग्रामीण भागात २०० विद्यार्थ्यांसाठी एक तर शहरी भागात २५० विद्यार्थ्यासांठी एक परीक्षा केंद्र असणार आहे. यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने सरमिसळ पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १७६ तर इयत्ता बारावीसाठी ११४ केंद्रे आहेत. त्यात यंदा सहा केंद्रांची भर पडणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे बोर्डाला पाठविला आहे. परीक्षा केंद्रावरील प्रत्येक हॉल किंवा वर्गात (ब्लॉक) २५ विद्यार्थी असतील. त्यापेक्षा एकही जास्त विद्यार्थी त्या हॉलमध्ये नसेल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.
(हेही वाचा – Indian Air Force: भारतीय हवाई दलाकडून अज्ञात वस्तूच्या शोधासाठी २ राफेल लढाऊ विमाने पाठवली, वाचा पुढे काय झालं… )
कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा सरमिसळ पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय पुणे बोर्डाने घेतला आहे. प्रात्यक्षिक परीक्षेवर बोर्डाच्या भरारी पथकांचे लक्ष असणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा कागदोपत्री नाही, तर प्रत्यक्षात घेणे अपेक्षित असल्याची माहिती पुणे बोर्डाचे सचिव औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे.
एका महाविद्यालयात दहावी किंवा बारावीचे १०० विद्यार्थी असतील, तर त्यातील बहुतेक विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयापासून तीन किलोमीटर परिसरातील वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देतील, अशी ही नवीन पद्धत आहे, अशी सरमिसळ पद्धतीची योजना आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community