महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत नोकरीची संधी; परीक्षेविना भरती, असा करा अर्ज

92

बॅंक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी असून महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक लिमिटेड (Maharashtra State Cooperative Bank) येथे Information Security अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदांच्या जाहिराती MSC recruitmemt या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा : One Nation One Exam : देशभरात द्यावी लागेल एकच परीक्षा, नीट-जेईई होणार नाही? )

पदांची नावे

  • ज्युनिअर ऑफिसरअंतर्गत सायबर सिक्योरिटी ऑपरेशनची ४ पदे
  • डिजिटल पेमेंट चॅनलची ३ पदे
  • सॉफ्टवेअरचे १ पद
  • नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे १ पद
  • ऑफिस डेटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे १ पद
  • ऑफिस सर्व्हर अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे १ पद

शैक्षणित पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठांतून अथवा शिक्षण संस्थेतून बीई/बीटेक कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स/एमसीए/एमएससी कॉम्प्युटर सायन्स/आयटीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
३० जून २०२२ पर्यंत २५ वर्षांपेक्षा जास्त वय नसावे

कागदपत्र
रेझ्युम, शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, ओळखपत्र, पासपोर्ट साइज फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑगस्ट

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.