‘या’ बँकेत आहे नोकरीची संधी! ताबडतोब करा अर्ज

119

सध्या व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. त्याप्रमाणे नवीन नोकऱ्याही समोर आल्या आहेत. बँकाही यासाठी नवीन निर्माण करत आहेत. म्हणून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक या पदांसाठी ही भरती होणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याकरता 25 मे 2022 ही शेवटची तारीख असणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती? 

  • प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी
  • प्रशिक्षणार्थी लिपिक

एकूण जागा – 195

(हेही वाचा भिडे, एकबोटेंना ओळखत नाही! चौकशी आयोगासमोर शरद पवारांची साक्ष)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी 

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवीपर्यंत शिक्षण घेतले असावे
तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले असावे
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असावा

प्रशिक्षणार्थी लिपिक 

किती वेतन मिळणार? 

  • प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – 20,000/- रुपये प्रतिमहिना
  • प्रशिक्षणार्थी लिपिक – 15,000/- रुपये प्रतिमहिना
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.