केंद्र सरकार पाठोपाठ महाराष्ट्रातही कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची भेट देताना सरकारने तीन टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला आहे.
राज्य शासकीय कर्मचारी, इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1 जुलै, 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 28 टक्क्यांवरुन 31 टक्क्यांवर गेला आहे. महागाई भत्ता वाढ 1 जुलै, 2021 पासूनच्या थकबाकीसह मार्च, 2022 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.
मार्चच्या पगारासोबत मिळणार थकबाकीची रक्कम
जुलै, 2021 ते 30 सप्टेंबर, 2021 या 3 महिन्यांच्या कालावधीतील 11% महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम मार्च, 2022च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Communityकोरोनाचा प्रभाव आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. सरकारकडे महसूल वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवून दिला आहे. १ जुलै २०२१ पासूनच्या थकबाकीसह हा महागाई भत्ता मार्च महिन्याच्या वेतनापासून दिला जाणार आहे. राज्य सरकारचे आम्ही आभार मानतो.
– ग. दि. कुलथे, संस्थापक व सल्लागार, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ