राज्यातील देवस्थानांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी यासंबंधी घोषणा करताना राज्यातील महत्वाच्या देवस्थानांच्या विकासासाठी तरतूद केली आहे.
धार्मिक स्थळे विकसित करण्यावर सरकारचा भर
महाराष्ट्र सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022-23 या वर्षासाठीचा भरीव अर्थसंकल्प सादर केला. कोरोना संकटामुळे जेरीस आलेल्या शेती, आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण आदी सर्वच विभागांना नवसंजीवनी देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या. महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प असून यात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीनुसार तो सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या तसेच आरोग्य यंत्रणा सुधारणेसाठीही यंदा विशेष निधी देण्यात आला आहे. याप्रमाणेच राज्यातील धार्मिक स्थळे विकसित करण्यावरही राज्य सरकारने भर दिला आहे.
(हेही वाचा मविआ मधल्या तिन्ही पक्षांचे खासदारही ‘डागाळलेले’! इतक्या खासदारांवर गुन्हे दाखल)
कोणत्या देवस्थानासाठी तरतुदी
- कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या विकासकामाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 25 कोटी
- अष्टविनायक मंदिर विकास आराखड्याकरीता 50 कोटीची तरतूद
- पंढरपूर देवस्थान मंदिर विकासासाठी 73 कोटी 80 लाख रूपये रकमेचा आराखडा मंजूर
- जिल्हा चंद्रपूर, येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद